breaking-newsताज्या घडामोडीपुणे

सलून आणि ब्युटी पार्लरची पुणेकरांसाठी नविन नियमावली…

राज्यातील सलून्स आणि ब्युटी पार्लर्स हे ठराविक नियमावलीत २८ जूनपासून पुन्हा सुरु करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सर्व सामान्यांसाठी हा निश्चितच महत्त्वपूर्ण निर्णय मानला जात आहे.मात्र पुण्यात सलून-ब्युटी पार्लर सुरु करण्याकरिता अनेक नियम-अटी असणार आहे… याबाबतची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. तर, पाहुया काय आहेत नियम पुणेकरांसाठी…

पुण्यात सलून-ब्युटी पार्लरसाठी ‘हे’ आहेत प्रमुख नियम
केश कर्तनालय, सलून आणि ब्युटी पार्लर या ठिकाणी केवळ पूर्व नियोजित वेळ निश्चित करून खालील अटींच्या आधारे प्रवेश नियंत्रित करण्यात येईल, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे.

■ केशकर्तन, केसांना रंग देणे, वॅक्सिंग, थ्रेडिंग, इ. सेवा देता येतील, मात्र त्वचेशी निगडीत कोणत्याही प्रकारची सेवा देता येणार नाहीत, याबाबत सूचना दुकानावर असाव्यात.

■ या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी संरक्षित साहित्य जसे, हातमोजे, अप्रोन आणि मास्कचा वापर करणे आवश्यक राहीन.

■ कामाचे सर्व ठिकाणी जसे खुर्च्या, दुकानातील मोकळी जागा, फरशी. इ. प्रत्येक २ तासांनंतर सॅनिटाइज होणे आवश्यक राहील.

■ दुकानात येणाऱ्या गिऱ्हाइकांसाठी केवळ एकदाच वापरता येणारे म्हणजे Disposable टॉवेल/नैकिनचा वापर करावा, सेवेकरिता जी उपकरणे एकदा वापरण्याजोगी नाहीत ती प्रत्येक सेवेनंतर सॅनिटाइज आणि निर्जंतुक करूनच वापरावीत,

■ केशकर्तन अनुषंगाने व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक दुकानावर वरीलप्रमाणे काळजी घेतली जाते, अशा आशयाची नोटीस माहितीसाठी प्रसिध्द करावी.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button