breaking-newsताज्या घडामोडीपुणे

सराफ व्यावसायिकांकडे 50 कोटींची मागितली खंडणी, राष्ट्रवादीचे मंगलदास बांदल अडचणीत

पुणे |महाईन्यूज|

पुणे शहरातील एका नामांकित सराफी व्यावसायिकास पिस्तुलाचा धाक दाखवीत व जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडे तब्बल 50 कोटी रुपयांची खंडणीची मागणी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल हे अडचणीत आले आहेत.

या प्रकणात आशिष पवार (वय 27), रमेश पवार (वय 32) आणि रुपेश चौधरी (वय 45) यांना खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. सराफाकडून 50 कोटींची मागणी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांची खंडणीप्रकरणी चौकशी सुरु आहे. यातील आशिष पवार हा काही दिवसांपूर्वी सराफांकडे बॉडीगार्ड म्हणून काम करीत होता.

पुण्यातील प्रसिध्द सराफ व्यावसायिक सौरभ गाडगीळ यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणात गाडगीळ यांच्या कुटुंबातील महिलेची एक व्हिडीओ क्लिप चोरून बनवण्यात आली होती आणि ती दाखवून गाडगीळ यांना ब्लॅकमेल करण्यात येत होतं. आशिष चौधरी याने पिस्तूल दाखवून सराफांना कोणाकडे वाच्यता केल्यास गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतरही सराफाने आम्ही इतकी मोठी रक्कम देऊ शकत नाही असं सांगितल्यावर सराफांना धमकी दिली जात होती. मात्र यानंतर सराफांनी पोलिसांकडे धाव घेतली. यानंतर पोलिसांनी आरोपीचे लोकेशन शोधून काढले. पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button