breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

‘संभाजी बिडी’ नाव अखेर बदलणार; आमदार रोहित पवार यांची माहिती

पुणे | प्रतिनिधी

पुण्यातील ‘साबळे वाघिरे आणि कंपनी’ ही कंपनी संभाजी बिडी या नावाने बिडी उत्पादन करते. पण
महाराष्ट्राच्या रोमारोमात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी प्रेम आणि अभिमान आहे. छत्रपती ही महाराष्ट्राची अस्मिता आहे, म्हणून आपल्या उत्पादनाचं नाव बदलण्याची मागणी असंख्य शिवभक्त आणि काही संघटना यांच्याकडून होत होती. काहींनी त्यासाठी उपोषणही केलं होतं. या विषयावर कंपनीच्या व्यवस्थापनाशीही माझी चर्चा झाली होती, अशी माहिती राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिली.

आमदार पवार म्हणाले की, सुमारे ६० ते ७० हजार महिला कामगारांचा रोजगार या कंपनीवर अवलंबून आहे. मात्र लोकभावनेचा, शिवभक्तांचा सन्मान ठेऊन ‘साबळे वाघिरे आणि कंपनी’ने आपल्या उत्पादनाचं नाव बदलण्याचा सकारात्मक निर्णय घेतला. लोकभावनेचा सकारात्मक विचार करणं हे महत्वाचं आहे आणि कोणतीही ताठर भूमिका न घेता कंपनी व्यवस्थापनाने ही सकारात्मकता दाखवली याबद्दल मी व्यवस्थापनाला धन्यवाद दिले.

कोणत्याही उत्पादनाचं नाव बदलणं ही कायदेशीर प्रक्रिया असते. त्यासाठी काही कालावधी लागतो. त्यानुसार या कंपनीलाही काही कालावधी लागणार आहे, मात्र ती प्रक्रिया आम्ही सुरू करत असल्याचं त्यांनी सांगितलं आणि तोपर्यंत सहकार्य करण्याची विनंती केली.

यानिमित्ताने मला एक गोष्ट सांगायचीय की, महाराष्ट्र ही संत-महंतांची, महापुरुषांची, वीरांची भूमी आहे. आपण कशाचं उत्पादन करतो आणि त्यासाठी या महापुरुषांचं नांव त्या उत्पादनाला देणं योग्य होईल का, याचाही विचार प्रत्येकाने करावा आणि आपल्या कृतीतून महापुरुषांचा कुठं अवमान किंवा अनादर होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी, असे आवाहनही आमदार पवार यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button