breaking-newsताज्या घडामोडीपुणे
संत गाडगेबाबा यांना लोकजनशक्ती पार्टी तर्फे अभिवादन
![Greetings to Sant Gadge Baba from Lok Janshakti Party](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/जन.jpg)
पुणे | प्रतिनिधी
लोक जनशक्ती पार्टी पुणे तर्फे संत गाडगेबाबा यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. साधू वासवानी चौकातील पक्ष कार्यालयात अभिवादन कार्यक्रम पार पडला. लोक जनशक्ती पार्टीचे पुणे शहर -जिल्हाध्यक्ष संजय आल्हाट यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी अशोक कांबळे, राहुल शेळके, के. सी. पवार, ऍड. अमित दरेकर, आप्पा भोसले, गणेश भोसले तसेच रिपब्लिकन ग्राहक परिषदेचे अध्यक्ष कन्हैय्या पाटोळे उपस्थित होते.