breaking-newsपुणे

शुल्क न भरल्याने परीक्षा देण्यास मनाई; इंग्रजी माध्यमाच्या व्यवस्थापनावर कारवाईची मागणी

पुणे |महाईन्यूज|

शैक्षणिक शुल्क न भरल्याने विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेस बसू न देण्याची घटना घडली आहे. धानोरीतील ‘गोकुलम स्कूल’ या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. शाळेच्या व्यवस्थापनावर प्रशासनाने कडक कारवाई करण्याची मागणी पालक करीत आहेत.

विद्यालयाची पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांची सध्या वार्षिक परीक्षा सुरू आहे. मात्र काही गरीब घरातील विद्यार्थी व पालकांना आर्थिक विवंचनेमुळे शैक्षणिक शुल्क देता आलेले नाही. शुल्कवसुलीसाठी शाळा प्रशासनाने काही विद्यार्थी-विद्यार्थिनींना वार्षिक परीक्षेस बसू न देता चक्क उन्हात उभे केले. पालकांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी विद्यालयात धाव घेतली. काही पालकांनी अंशत: शुल्क भरण्याची तयारी दाखवली. मात्र विद्यालयाने पूर्ण शुल्क भरल्याशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू न देण्याचा शेवटपर्यंत पवित्रा घेतला. यामुळे पालक व विद्यालय व्यवस्थापनात बाचाबाची होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शैक्षणिक शुल्कासाठी अडवणूक करून विद्यार्थ्यांना परीक्षेस न बसू देता, या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणा-या या विद्यालयाच्या व्यवस्थापनावर कडक कारवाई करण्याची मागणी पालकवर्गातून होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button