महापालिकेच्या विविध विकास कामांचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे हस्ते भूमिपूजन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/कासारवाडी.jpg)
पिंपरी- शहरात महापालिकेच्या वतीने विविध विकासकामांचे भूमिपुजन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते योगेश बहल, नगरसेवक शीतल शिंदे, नगरसेविका सुजाता पालांडे, आशा धायगुडे-शेडगे, सुलक्षणा शीलवंत-धर आदी उपस्थित होते.
कासारवाडी येथील छत्रपती शाहू महाराज विद्यालयाच्या परिसरात नवीन शाळा इमारत बांधण्यात येणार आहे. आणि फुगेवाडी येथे नवीन इमारत उभारण्यात येणार आहे. या कामासाठी सुमारे 4 कोटी 62 लाख इतका खर्च येणार आहे. त्या इमारती कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आवश्यक कामे, नवजात अर्भक विभागाचे नुतनीकरण व डॉक्टर निवास्थानाचे नुतनीकरण आदी कामे करण्यासाठी सुमारे पाच कोटी इतका खर्च येणार आहे. यामध्ये एम.सी.ए. नॉर्मस नुसार 10 विभागांसाठी एकूण 45 कक्ष, वाचनालय,मध्यवर्ती संशोधन प्रयोगशाळा कक्ष आणि स्वतंत्र स्वच्छतागृह इत्यादी कामे करण्यात येणार आहेत. त्या कामाचा भूमीपुजन करण्यात आले.