breaking-newsताज्या घडामोडीपुणे

व्हाॅट्सअॅप वापरताना खबरदारी घ्या, हॅकिंगची प्रकरणे वाढू लागली

पुणे |महाईन्यूज|

व्हॉट्सअॅप हॅकिंगची वेगवेगळी प्रकरण समोर येऊ लागल्याने सोशल मीडियाव्दारे संपर्कासाठी सर्वाधिक वापरले जाणारे हे माध्यम कितपत विश्वासार्ह आहे याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. व्हिडीओ-ऑडिओ कॉल, फोटो शेअरींग करताना खबरदारी घेण्याची गरज असून, पोलिसांना देखील व्हॉट्सअपकडून माहिती मिळविण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांच्या सायबर सेलकडून सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून पाठविल्या जाणाऱ्या अनेक मेसेजवर करडी नजर असते. प्रामुख्याने यासाठी काही की-वर्ड (परवलीचा शब्द) पोलिसांकडून निवडले गेले आहेत. यातून भावना भडकाविणारे मेसेज, कोणत्याही प्रकारचे जातीय दंगलीच्या अनुषंगाने जुने व्हिडिओ,फोटो फोटो पुन्हा प्रसारित करून अफवा पसरविणाऱ्यांवर लक्ष असते. तसेच धार्मिक, प्रांतिक, सामाजिक चालु विषयांवर देखील होणाऱ्या पोस्टवर लक्ष ठेवले जात असते.

खबरदारी महत्त्वाची

  • अनोळखी नंबरवरून आलेल्या व्हिडीओ-ऑडिओ कॉलला प्रतिसाद देऊ नका.
  • अनोळखी व्यक्तीशी चॅटिंग करू नका.
  • व्हॉट्सअॅपवरून आलेल्या मेसेजमधील लिंक ओपन करण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळा
  • कोणताही मेसेज फॉरवर्ड करताना त्याची सत्यता पडताळा
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button