breaking-newsताज्या घडामोडीपुणे

विद्यार्थ्यांकडून ‘गो कोरोना’चा संदेश

सोलापूर – देशात आतापर्यंत कोरोनामुळे ३ जणांनी आपला जीव गमावला आहे. यात महाराष्ट्रातील एकाचा समावेश असून राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा ४१ वर पोहचला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी सरकारसोबत काही स्वंयसेवक संस्थाही पुढे सरसावल्याचे पाहायला मिळाले आहे.  

सोलापूर जिल्ह्यातील पापरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी धोकादायक ठरत असलेल्या या विषाणूला मानवी साखळी तयार करून ‘गो कोरोना’ असा संदेश दिल्याचे पाहायला मिळाले. शाळेतील विद्यार्थ्यांना कोरोनो विषाणची संदर्भात प्राथमिक लक्षणं,त्या पासून दूर राहण्यासाठि कोणती काळजी घ्यावी आणि स्वछता तसेच शिंकताना आणि खोकताना रुमाल वापरण्यासंदर्भातील सूचनाही शिक्षांकडून देण्यात आल्या आहेत.

कोरोनाला परत जा असे सांगण्यासाठी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सोमवारी शिक्षकांच्या मार्गदर्शनाने ‘गो कोरोना’ असा संदेश देणारी मानवी साखळी तयार केली होती. या अगोदरही येथील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या उपक्रमातून सामाजिक संदेश देत शाळेचं लक्षवेधले आहे. यावेळी मुख्याध्यापक श्रीकांत खताळ, शिक्षक भास्कर थोरात, राजेंद्र सरवदे, लक्ष्मण उगले, पालक संजय गायकवाड, सीताराम गवळी यांच्यासह इतर शिक्षिकाही उपस्थितीत होत्या.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button