breaking-newsपुणे

वारजे येथे महामार्गावर ट्रक पलटल्यामुळे वाहतुकीचे तीन तेरा

पुणे –  मुंबई बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर वारजे येथील अतुलनगर समोर ट्रक पलटी झाल्याने महामर्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सोमवारी (दि. २८ ) पहाटे तीन वाजता अपघात होऊनही पलटी झालेला ट्रक काढायला सकाळी साडे नऊ वाजल्याने या ठिकाणी

याबाबत सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार, सूरतहून पार्सल घेऊन हा ट्रक (केए.२२ ए. ८६९७) बंगळुरूच्या दिशेने निघाला होता. मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास डुक्कर खिंडीच्या पुढे रुणवाल पूलाच्या उतारावर  चालकाचे नियंत्रण सुटले. याठिकाणी माई मंगेशकरजवळ नवीन पुलाचे काम सुरु असल्याने अंधारात कठड्याचा अंदाज न आल्याने गाडी त्याच्यावरूनच घसरुन पलटी झाल्याचा अंदाज वाहतूक कर्मचारी व पोलिसांनी व्यक्त केला. सुदैवाने यात चालकास कोणतीच इजा झाली नाही.

यानंतर वाहतूक विभागाकडून काहीप्रमाणात वाहतुक वळवण्याचा प्रयत्न केला. पण सकाळी सातनंतर मात्र या ठिकाणी चांदणी चौक व वडगाव दोन्ही बाजूला कोंडी वाढत गेली. भरलेला अवजड ट्रक क्रेनने उचलणे अवघड जात असल्याने यातील पार्सल बाहेर काढून ट्रक मोकळा करण्यात आला. व सकाळी साडे नऊच्या सुमारास ट्रक बाजूला काढण्यात आला. संपूर्ण वारजे परिसर, महामार्ग व सेवा रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी पाहायला मिळाली. अकरा वाजले तरी परिसरातील वाहतुक सुरळीत झाली नव्हती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button