breaking-newsताज्या घडामोडीपुणे

वारजे महामार्गावर एक आयसर कंटेनर ट्रकला भीषण आग

पुणे |महाईन्यूज|

वारजे येथील माई मंगेशकर रुग्णालयासमोरील महामार्गावर एक आयसर कंटेनर ट्रकला भीषण आग लागल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. यामध्ये कंटेनर जळून खाक झाला. भर रस्त्यात कंटेनर पेटल्यामुळे महार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर चालक उद्धव किसन वाघमारे हे पनवेल येथून एका हॉटेल्सचे खाद्य पदार्थ घेऊन कोल्हापूरकडे निघाला होता. वारजे जवळील नवीन उड्डान पुलावर सायंकाळी पाचच्या सुमारास हा कंटेनर आल्यानंतर चालकास कंटेनरचा ब्रेक लागत नव्हता. त्यामुळे त्याने प्रसंगावाधान दाखवून कंटेनर बाजूला घेतला.

चालक व वाहक खाली उतरले. त्यांनी ब्रेक का लागत नाही. याची पाहणी केली. त्यावेळी इंजिन मधून धूर येत असल्याचे दिसले. तसेच, कंटेनरला आग लागलेली दिसून आली. ट्रकचे चालक व वाहक घाबरून बाजूला झाले. त्यानंतर आगीने रौद्ररूप धारण केले. काही वेळातच आग पूर्ण ट्रकला लागली होती. मोठ्या प्रमाणात लागलेल्या आगीच्या ज्वाळांमुळे ट्रक पूर्णता आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता.

दूर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागल्याने महामार्गावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. घटनास्थळी वारजे माळवाडी पोलिस व अग्निशमन दलाने धाव घेतली. वाहतूक विभागाचे पोलिस दाखल होत पोलिसांकडून महामार्गवरील वाहतूक थांबवित आग विझविण्यासाठी अग्निशमन दलास मदत केली.

सिंहगड रोड, कोथरूड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पाण्याचा मारा करून ही आग विझविली. मात्र, या आगीमुळे महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. लागलेल्या आगीत ट्रक पुर्णता जळून खाक झाला. इंजिनमध्ये शॉटसर्कीट होऊन आग लागली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button