breaking-newsताज्या घडामोडीपुणे

लोणावळ्यात २४ तासात १७२ मिमी पाऊस

लोणावळा –  गेल्या दोन दिवसांपासून लोणावळा व परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाचे आगार असलेल्या घाटमाथ्यावरील लोणावळा शहरात मागील चोवीस तासात तब्बल १७२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून लोणावळा व परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. सततधार कोसळणारा पाऊस व वारा यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून इंद्रायणी नदी व डोंगरभागातू वाहणारे नाले हे दुथडी भरुन वाहू लागले आहे. तर वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे पडल्याने विजेचा खोळंबा झाला आहे. गेल्या दोन दिवसापासून जोराचा वारा व पाऊस परिसरात पडत असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले असून त्याचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. पावसामुळे महामार्गांवरील वाहतुक देखील मंदावली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button