लग्नाच्या अमिषाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार : येरवडा पोलिसांनी केली तरूणाला अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/rape-case-art.jpg)
पुणे – लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एका 23 वर्षीय तरूणाला अटक केली. विशेष न्यायाधीश आर.व्ही.अदोणे यांनी त्याला 2 जूलैंपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला आहे.
राजकुमार आत्माराम सातपुते (वय 23, रा. येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित 16 वर्षीय तरूणीने फिर्याद दिली. पीडित मुलीची आणि राजकुमार याची पुणे रेल्वे स्टेशनवर भेटल्यानंतर ओळख झाली. त्यानंतर राजकुमार याने पीडित मुलीला लग्नाचे अमिष दाखवून जेजूरी येथे नेले. त्या ठिकाणी मंदिरामध्ये पीडित मुलीच्या गळ्यात हार घालून लग्न केले. दरम्यान राजकुमार याने पीडित मुलीवर बलात्कार केला, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. याबाबत राजकुमार याला अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. त्यामुळे गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्याला पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी अतिरिक्त सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने राजकुमार याला पोलीस कोठडी सुनावली.