breaking-newsताज्या घडामोडीपुणे

राहुल गांधींनी लवकर लग्न करावं : रामदास आठवले

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता पुढील पंधरा वर्ष काही केल्या जात नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनी देशभरात किती प्रचार केला. तरी देखील युपीएची सत्ता येणार नाही. अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मांडत. मोदी फकीर असून राहुल फकीर नाहीत.  त्यामुळे देशभरातील जनतेला राफेलवरून गाफील करू नये. हे लक्षात घेता राहुल गांधी यांनी लवकर लग्न करावं असा सल्ला देखील त्यांनी दिला.  यावेळी पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार पालकमंत्री गिरीश बापट, विद्यमान खासदार अनिल शिरोळे, शिवसेना नेत्या आमदार नीलम गोऱ्हे तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी रामदास आठवले म्हणाले की, देशभरात एनडीएला चांगला प्रतिसाद मिळत असून महाराष्ट्रात देखील महायुतीच्या प्रत्येक ठिकाणी होणार्‍या सभेला मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होत आहे. मागील पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात अनेक योजनांच्या माध्यमातुन सर्व सामन्याचे जगणे सहज केले आहे. शेवटच्या घटकाला केंद्र बिंदू ठेवून त्यांनी योजना राबविल्या आणि त्यामध्ये ते यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले.

मोदींच्या या कारभारामुळे पुन्हा देशात मोदी सरकार असल्याचे त्यांनी सांगितले.  तसेच ते पुढे म्हणाले की, राज्यात मागील काही दिवसांपासून ज्या तिसर्‍या आघाडीची चर्चा सुरू आहे. ती वंचित आघाडी नसून किंचित आघाडी असल्याची टीका त्यांनी केली. तसेच ते पुढे म्हणाले की, या वंचित आघाडीचा फायदा केवळ महायुतीला होणार असल्याचे सांगत. ते पुढे म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांच्या बद्दल बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असल्याने मला प्रचंड आदर असून त्यांनी जी वंचित आघाडी स्थापन केली. त्यापेक्षा त्यांनी भाजप सहभागी होऊन काम करण्याची गरज होती.

प्रकाश आंबेडकर भाजप सोबत आले असते. तर त्यांना एखाद मंत्री पद देखील मिळाले असते, अशी भूमिका त्यांनी मांडली. तर ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील वाद मिटला आहे. ही राज्यासाठी चांगली बाब आहे. मात्र प्रकाश आंबेडकर आणि माझ्यातील वाद काही मिटत नाही. पण आमच्या दोघांमधील वाद काही टोकाचा नसल्याचे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button