Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील यांचा आॅडिआे क्लिप व्हायरल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/0deepak_salunkhe_40sangola.jpg)
सोलापूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील यांची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. त्यामध्ये साळुंखे हे पक्षाच्या एका महिला कार्यकर्त्यांच्या विषयी अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत असल्याचं उघड झालं आहे. दीपक साळुंखे यांनी आपल्याच पक्षाच्या अक्कलकोट तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला तालुका अध्यक्ष सुरेखाताई पाटील यांना शिव्या देऊन उल्लेख केला आहे. या संभाषणामुळे साळुंखे पाटील यांच्याविषयी तीव्र रोष व्यक्त होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महिलांविषयी अगदी हिरहिरीने बोलत असतात. शरद पवारांचे महिला विषयीचे धोऱण, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना दिलेले आरक्षण असो. पवारांचा नेहमीच महिलांविषयी पाहण्याचा दृष्टीकोण पुरोगामी राहिला आहे. मात्र त्यांचेच चेले हे जर असं महिलांविषयी बोलत असतील. तर त्या पुरोगामी पणाचा काय उपयोग आहे. भले हे संभाषण राजकीय स्वार्थासाठीही रेकॉर्ड केलेले असले तरी अशा खाजगी संभाषणात महिलांविषयी राष्ट्रवादीचे नेते किंवा पदाधिकारी काय बोलतात ते स्पष्ट होतं. महिलांविषयी अशा बेताल आणि अर्वाच्य भाषेत संभाषण करणा-या जिल्हाध्यक्षांवर राष्ट्रवादी काँग्रेस काय कारवाई करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान या ऑडिओ क्पिपमधील आवाज आपला नसल्याचा दावा साळुंखे पाटील यांनी केला आहे. ही ऑडिओ क्लिप आमच्याकडे आहे, मात्र त्यात अत्यंत अर्वाच्य शब्दांचा वापर आहे. त्यामुळे ती आम्ही या ठिकाणी देत नाहीत.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने साळुंखे पाटलांना फोन करुन पदाधिकाऱ्यांच्या निवडी केव्हा करणार याबाबत विचारणा केली असता, त्यांनी पक्षातील महिला पदाधिकारी आणि सोलापुरातील ज्येष्ठ नेत्यांबद्दल अवमानकारक शब्दप्रयोग केला आहे. शरद पवार आहेत तो पर्यत माझं जिल्ह्यातूनच काय तर राज्यातूनही कोणी *** वाकडं करू शकत नाही, तसंच मोहिते पाटलांचे चमचे, **** लोकांनी आपल्याला पक्ष निष्ठा शिकवू नये”. अशा प्रकारचे बेताल आणि शिवराळ संभाषण या ऑडियो क्लिपमध्ये आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/76a266edbaff08c36013aed10dd9c8f2-300x179.jpg)