breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘या जन्मातलं याच जन्मी फेडावं लागतं’, उदयनराजेंचा शरद पवारांना टोला

पुणे |महाईन्यूज |प्रतिनिधी|

माजी खासदार आणि भाजपचे नेते उदयनराजे भोसले हे शरद पवारांना कायम गुरुस्थानी मानतो असं कायम सांगत असतात. राष्ट्रवादी सोडल्यानंतरही पवार माझ्या वडिलांसारखे आहेत. त्यांच्याविषयी माझ्या मनातला आदर कधीच कमी होणार नाही असंही ते कायम सांगत असतात. मात्र EDने पवारांविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतरची त्यांची प्रतिक्रीया मात्र चक्रावणारी आहे.

उदयनराजे म्हणाले, या जन्मातलं याच जन्मी फेडावं लागतं, दुसरं काय? ही प्रतिक्रिया त्यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी दिली. दोनच दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले हे पवारांच्या आठवणी सांगताना रडू लागले होते. त्यांच्या आठवणी सांगतांना त्यांना अश्रू अनावर झाले होते. पवार जर साताऱ्यातल्या पोटनिवडणुकीत उभे राहिले तर मी निवडणूक लढणार नाहीत असंही ते म्हणाले होते. त्यामुळे त्यांच्या या प्रतिक्रियेबद्दल आश्चर्य व्यक्त होतंय.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button