breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मास्क आणि सॅनिटायझरची वाढीव दराने विक्री,पुण्यातील 4 मेडिकल स्टोअर्सवर कारवाई

पुणे |महाईन्यूज|

पुणे शहरामध्ये कोरोना व्हायरसचे एकूण 9 रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.अमेरिकेहून 1 मार्च रोजी पुण्यातील नागरिक परत आला होता. त्याची तपासणी 11 मार्च रोजी करण्यात आली होती. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. मास्क आणि सॅनिटायझरच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे. मात्र, वाढीव दराने मास्क आणि सॅनिटाइझर विकणाऱ्या पुण्यातीस चार मेडिकल स्टोअर्सवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. चारही मेडिकल स्टोअर्सना औषधी खरेदी आणि विक्री करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

सहआयुक्त सुरेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसची लागन होऊ नये, यासाठी नागरिक मेडिकलमधून सॅनिटायझर आणि मास्क खरेदी करत आहेत. मात्र, अनेक मेडिकल वस्तूंची दुप्पट किंमत वसूल करत नागरिकांची लूट करत असल्याचे निदर्शनास आले होते. तसेच नागरिकांकडूनही तक्रारी मिळाल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेऊन अनेक मेडिकल स्टोअर्सवर छापा टाकण्यात आला. बनावट उत्पादनेही विकले जात असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर अन्न व औषध विभागाने कारवाईसाठी पथकाने चार मेडिकल स्टोअर्स टाळं ठोकण्यात आलं आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात आतापर्यंत तब्बल 165 मेडिकल्सची तपासणी करून त्या पैकी कोथरूड परिसरातील न्यु पूजा मेडिकल आणि मेट्रो मेडिकल तर गोखले नगर परिसरातील ओम केमिस्ट् आणि म्हाळुंगे येथील महालक्ष्मी मेडिकल ह्या चार मेडिकल्सना खरेदी-विक्री करण्याचे निर्बंध घालण्यात आले आहे. अशा वाढीव दराने कुणी मास्क आणि सॅनिटायझरची विक्री करत असल्यास त्यांनी त्वरित अन्न व औषध विभागाशी संपर्क साधवा. संबधित मेडिकलवर छापा टाकून त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासनही पाटील यांनी दिलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button