Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
मलाच मुख्यमंत्री व्हायचे आहे – ‘उपरा’कार लक्ष्मण माने
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/download-5.jpg)
पुणे – “मला त्यांनी लोणच्यासारखं वापरलं म्हणून मी चाळीस वर्षांचे संबंध तोडले आहेत. त्यांना मी आता काही मागणार नाही. आता आम्ही मागणारे नाही तर देणारे आहोत. आता मलाच मुख्यमंत्री व्हायचे आहे. मी का मुख्यमंत्री होऊ नये?”असा सवाल ‘उपरा’कार, माजी आमदार लक्ष्मण माने उपस्थित केला.
मराठ्यांनी कितीही उड्या मारल्या तरी ते महाराष्ट्रापुरते आहेत. त्यांची देशपातळीवर संख्या दीड टक्के आहे. देशात ब्राह्मणांची लोकसंख्या जास्त आहे, त्यामुळे त्यांचाच माणूस पंतप्रधान होऊ शकतो.ते बहुजनांचा मेळ लावू देत नाही.”असंही ते म्हणाले. पुणे येथे आयोजित केलेल्या पहिल्या ओबीसी जागरण परिषदेत माने बोलत होते. यावेळी माजी आमदार प्रकाश शेंडगे, शंकरराव लिंगे, सचिन माळी उपस्थित होते.