breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

पुणे | मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन मंगळवारी पहाटेच्या सुमारास निधन झाले आहे. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष, मराठा क्रांती मोर्चा आणि किसान क्रांती मोर्चाचे समन्वयक कुंजीर यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया पार पडली होती. जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मुंढवा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

अखिल भारतीय मराठा महासंघातून त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली होती. पुणे जिल्हा सरचिटणीस पदी असताना त्यांनी अनेक आंदोलने मोर्चांमध्ये सक्रीय सहभाग नोंदवला. यानंतर त्यांनी मराठा सेवा संघ आणि बामसेफ अशा संस्थांसोबत काम केले. मग काही दिवसांनी संभाजी ब्रिगेडची जबाबदारी पार पाडली. मराठा आरक्षणासाठी शिवनेरीवर झालेल्या आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता. या दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरवर दगडफेक झाली होती. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. राज्यातील शेतकरी आंदोलनांमध्ये सुद्धा त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. परस्परविरोधी लोकांशीही त्यांनी समन्वय साधत यशस्वी आंदोलने केली होती. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळ-हळ व्यक्त केली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button