breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

मद्यधुंद ट्रक चालकानं सहा वाहनांना दिली धडक

पुणे |महाईन्यूज|

मद्यधुंद ट्रक चालकाने बारामती शहरातील भिगवण रस्त्यावर पाच ते सहा वाहनांना धडक दिली. या ट्रक चालकाला आवरणे जिकिरीचे बनले असताना सागर खलाटे या युवकाने धाडसाने दुचाकीवरून पाठलाग करत न्यायालयाजवळ हा ट्रक थांबविला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान ट्रकचालकाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या चालकाने मद्यधुंद अवस्थेत ट्रक चालवत पाच ते सहा वाहनांना धडक दिली. त्यात एका रिक्षाचे मोठे नुकसान झाले. सोमवारी (दि. ४) सकाळी भिगवण रस्त्यावर हा थरार नागरिकांना पाहायला मिळाला. ट्रकचालक वाहनांना धडक देत पुढे जात असल्याने रस्त्यावरील वाहनधारकांना आपआपली वाहने इकडे- तिकडे पळविण्याची वेळ आली. याच दरम्यान राष्ट्रवादी कॉग्रेसचे पदाधिकारी सागर खलाटे यांनी धाडसाने या ट्रकचा पाठलाग सुरु केला. काही वेळानंतर न्यायालयाजवळ हा ट्रक थांबविण्यात सागर खलाटे यांना यश आले. यामुळे होणारा मोठा अनर्थ टळला.

त्यानंतर पोलिसांना पाचारण करत ट्रक चालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेतील जखमींवर शहरातील सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button