Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
भोसरीत तरूणाची गळफास घेवून आत्महत्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/sucide_2017082133.jpg)
पिंपरी : भोसरी येथे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. रितेश शिवाजी लांडे (वय २०, रा. भोसरी), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितेशच्या घरातील सर्वजण त्याच्या मावस बहिणीच्या लग्नासाठी गेले होते. यावेळी रितेशने रात्री पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. रितेशने गळफास घेतल्याचे समजताच त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. भोसरी पोलीस अधिक तपास करत आहे.