breaking-newsताज्या घडामोडीपुणे

भाजप खासदार राजू शेट्टींचा दाभोलकर करण्याच्या तयारीत : रविकांत तुपकर यांचा आरोप

जयसिंगपूर – भाजप सरकार खासदार राजू शेट्टी यांचा नरेंद्र दाभोलकर करण्याच्या तयारी आहे, असा खळबळजनक आरोप ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केला. एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर आपणाला ही माहिती दिल्याचे सांगत शेट्टी सोडाच ‘स्वाभिमानी’चा बिल्ला लावलेल्या सामान्य कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लागला तर घरात घुसून मारू, असा इशाराही त्यांनी दिला.

राजू शेट्टींना सांगलीतून लढण्याचे आव्हान देणाºयांनी शेट्टींसोबत ‘माढ्या’तून लढावे व मुख्यमंत्र्यांनीच ‘हातकणंगले’मधून लढावे, असे आव्हानही त्यांनी दिले.जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथील १७ व्या ऊस परिषदेत तुपकर यांनी भाजप सरकारसह कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार हला चढविला.

तुपकर म्हणाले, शरद पवार व कॉँग्रेसच्या नादाला लागल्याचा आरोप काही मंडळी करीत आहेत; पण गेल्या १७ वर्षांत ‘स्वाभिमानी’च्या व्यासपीठावर एकही कॉँग्रेस-राष्टÑवादीचा नेता दिसला नाही. उलट शेट्टींचा धसका घेऊन मुख्यमंत्र्यांना कोल्हापुरात येऊन परिषद घ्यावी लागते, हा शेतकºयांचा विजय आहे. सत्ताधाºयांनी परिषद बोलवायची नसते, तर मुंबईत बसून निर्णय जाहीर करायचा असतो. मुख्यमंत्री साहेब तुमचे दिवस भरले असून, उलटी गिनती सुरू झाली आहे. भाजपच्या नेत्यांना आता रोजगार हमीच्या कामावर पाठविल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही. शेट्टींवर टीका करणाºयांच्या कुंडल्या आमच्याकडे आहेत. वेळ आल्यानंतर एक-एक पुरावे बाहेर काढू. आतापर्यंत नुसते सांगलीतीलच बोललो. शेट्टींची कळ काढाल तर सगळ्या भानगडी बाहेर काढू, असा इशाराही त्यांनी सदाभाऊ खोत यांना दिला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button