breaking-newsताज्या घडामोडीपुणे
भाजप रोजगार आघाडी पुणे शहर उपाध्यक्षपदी सनी परदेशी यांची निवड
पुणे । प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी रोजगार आघाडी पुणे शहर उपाध्यक्षपदी धनराज उर्फ सनी परदेशी यांची निवड करण्यात आली. भारतीय जनता पक्ष कार्यालय जंगली महाराज रस्ता येथे झालेल्या या कार्यक्रमात ही मागणी करण्यात आली. पुणे शहर भाजप अध्यक्ष जगदीश मुळीक, भाजप पुणे शहर चिटणीस गणेश घोष, भाजप रोजगार आघाडी अध्यक्ष संतोष परदेशी आदी या वेळी उपस्थित होते. या प्रसंगी सनी परदेशी यांनी आगामी काळात युवकांना रोजगार प्रश्नी व त्यांच्या विविध समस्यांवर कार्य करणार असल्याचे नमूद केले.