breaking-newsताज्या घडामोडीपुणे

भाजप खासदाराला कोणत्याही क्षणी होणार अटक

सोलापूर –  भाजप खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महाराजांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाने खासदारांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने जयसिध्देश्वर शिवाचार्य महाराज यांना कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जयसिध्देश्वर शिवाचार्य महाराज यांनी निवडणूक लढवताना आयोगाकडे दाखल केलेले जातप्रमाणपत्र बनावट असल्याचं समोर आलं होतं. जातपडताळणी समितीने खासदार महास्वामींचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निकाल दिला होता.

यापूर्वीच गुन्हा दाखल

भाजप खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी लोकसभा निवडणुकीत बनावट जातप्रमानपत्र दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी काही दिवसांपूर्वी जयसिद्धेश्वर यांच्याविरुद्ध अक्कलकोट तहसीलदारांनी सोलापूर न्यायालयात दाखल केलेल्या फिर्यादीवर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने 156/ 3 प्रमाणे पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर सदर बझार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे जयसिद्धेश्वर यांच्या समोर अडचणी वाढल्या आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button