बहिणीसोबत फिरत होता, म्हणून फुटबॉलपटूची हत्या, राष्ट्रवादी नगरसेवकच्या पुत्राविरोधात गुन्हा दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/22.jpg)
सोलापूर |महाईन्यूज|
सोलापूरात प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या करण्यात आली आहे. फुटबॉलपटू असलेल्या प्रदीप विजय अलाट या युवकाची प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचं माहितीसमोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नागेश गायकवाड यांचा पुत्र चेतन गायकवाड यांच्यासह पाच ते सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम प्रकरणातून प्रदीपला बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये गंभीर जखमी झाल्यामुळे प्रदीपचा जागीच मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केली आहे. मृत प्रदीप हा एक उत्कृष्ट फुटबॉलपटू होता. सोबतच विविध शाळांमध्ये क्रीडा प्रक्षिशक म्हणून ही कार्य करत होता.
सोलापूर विद्यापीठात सुरू असलेल्या क्रीडा स्पर्धेसाठी स्वयंसेवक म्हणून जाण्यासाठी तो घरातून बाहेर पडला होता. मात्र, संध्याकाळच्या सुमारास सोलापुरातल्या मोदी परिसरातील गंगामाई रुग्णालयात गंभीर जखमी अवस्थेत अज्ञात व्यक्तींनी त्याला दाखल करत पळ काढला. उपचारापुर्वीच प्रदीपचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
दरम्यान, नागेश गायकवाड यांच्या पुतनीसोबत प्रदीपला फिरताना पाहण्यात आलं होतं असं फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आलं आहे. त्याच्या रागातच चेतन गायकवाड याच्यासह पाच ते सहा जणांनी प्रदीपची हत्या केली असल्याचं सांगण्यात येत आहे. आरोपी चेतन गायकवाडसह त्याचे मित्र फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.