Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
बँक ऑफ महाराष्ट्रात 30 लाखाचा अपहार; बँक व्यवस्थापकावर गुन्हा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/CRIME-KADI.jpg)
बँक ऑफ महाराष्ट्राच्या कोंढवा-बुद्रुक येथील शाखेत बँक व्यवस्थापकानेच 30 लाखाचा अपहार केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी शालीवाहन मुकूंद सोलेगावकर (रा.आनंदनगर, सिंहगड रोड) या बँक व्यवस्थापकावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बँकेचे झोनल ऑफीसर संजीव नारखेडे (वय-59, रा.कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी शालीवाहन हे बँक ऑफ महाराष्ट्राच्या कोंढवा बुद्रुक येथील शाखेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी 17 जानेवारी ते 10 मे 2018 या कालावधीत बँक अधिका-यांच्या पासवर्डचा गैरवापर करून 30 लाख 93 हजार रुपये एका व्यक्तीच्या बँक खात्यात जमा केले. त्यानंतर ही रक्कम परस्पर काढून घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक के.के.कांबळे अधिक तपास करीत आहेत.