पुणे

फक्त! हॉर्न वाजवल्यामुळे बेदम मारहाण

रस्त्यावर उभ्या असणाऱ्या कारला पुढे जाण्यासाठी ट्रक चालकाने हॉर्न वाजवला. यावरून कारच्या मागे थांबलेल्या दोघांनी ट्रक चालकाला दगड आणि काचेच्या बाटलीने मारले. चालकाला खाली उतरवून मारहाण करत ट्रक मधील 23 हजार रुपये जबरदस्तीने काढून नेले. ही घटना रविवारी (दि. 27) सकाळी साडेसात वाजता वाकड ब्रिज खाली घडली.

जगदीश ज्ञानेश्वर तोतरे (वय 27, रा. कुरवंडी, ता. आंबेगाव) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी नितीन राम अवताडे (वय 35, रा. थेरगाव), अरबाज बशीर शेख (वय 23, रा. गहुंजे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तोतरे ट्रक घेऊन बेंगलोर-मुंबई महामार्गावरून जात होते. वाकड ब्रिजखाली सर्व्हिस रोडवर त्यांच्या ट्रक समोर एक कार रस्त्यात थांबली होती. त्यामुळे तोतरे यांनी ट्रकचा हॉर्न वारंवार वाजवला. यावरून कारच्या पाठीमागे थांबलेल्या आरोपीने तोतरे यांना दगड फेकून मारला. त्यानंतर काचेची बाटली फेकून मारली. यात फिर्यादी तोतरे जखमी झाले. जबरदस्तीने ट्रकमध्ये घुसून ट्रकच्या केबिनमधील बॉक्समध्ये ठेवलेले 23 हजार रुपये आरोपी घेऊन गेले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button