प्रभाग क्रमांक ०३ मध्ये भामा आसखेडचे पाणी दाखल
![Water of Bhama Askhed filed in ward no ३](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/rahul-bhandare-२.jpg)
– नगरसेवक राहुल भंडारे, प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते आनंदोत्सपर उदघाटन
पिंपरी | प्रतिनिधी
भामा आसखेड या स्वप्नपूर्ती प्रकल्पाचे पाणी प्रभाग क्रमांक 3 मधील टाकी मध्ये सोडण्यात आले. त्यामुळे प्रभागातील सर्व सोसायट्या व परिसरातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. भविष्यात संपूर्ण प्रभाग हा टॅंकरमुक्त होण्याच्या मार्गावर असल्याचे प्रतिपादन नगरसेवक राहुल भंडारे यांनी केले.
या वेळी नगरसेवक भंडारे व प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते सदर प्रकल्पाचे विमाननगर येथील पाण्याच्या टाकीच्या ठिकाणी आनंदोत्सपर उदघाटन करण्यात आले. सदर पाणी नकाश्याप्रमाणे निश्चित केलेल्या वेळेनुसार नागरिकांना सोडण्यात येणार आहे.
या वेळी विजय परिहार, धरमपाल धिंडवाल, मलकाणी, वसंत गिलबिले, दीप, पराग, कॅप्टन मोहन, नंदनवार, मुमताज शेख, रुप सिंग, डॉ. जानराव चौधरी, सावंत मिलिंद, विविध सोसायटी मधील सेक्रेटरी व चेअरमन उपस्थित होते. सर्व नागरिकांनी नगरसेवक राहुल भंडारे यांनी सातत्याने या पाणी प्रकल्पाचा पाठपुरावा केल्यामुळेच आंम्हाला पाणी मिळत असल्याच्या भावना व्यक्त केल्या.