Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
प्रतिबंधित क्षेत्र वगळता पुण्यात वारांनुसार दुकाने सुरु राहणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/punemarket.jpg)
पुणे | पुण्यातील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता पुण्यात कडक बंदोबस्त करण्यात येत आहे. मात्र, प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागात काही दुकाने सुरु करण्याची परवानगी पालिकेने दिली आहे. मात्र, दुकानदारांना वार नेमूण देण्यात आले आहेत. त्यांना याच वारी दुकाने सुरु करता येणार आहेत.
सोमवार, बुधवार, आणि शुक्रवारी इलेक्ट्रिक साधने, संगणक साहित्य, मोबाईल विक्री, भांड्यांची दुकाने ही दुकाने सुरु राहणार आहेत. तर, मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी वाहनांची दुरुस्ती, गॅरेज, हार्डवेअर, प्लंबिंग, बांधकाम साहित्य, कपड्यांची दुकाने, डेअरी उत्पादने ही दुकाने सुरु राहणार आहेत.