पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम यांचे पुणेकरांना आवाहन…काय म्हणले वाचा!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/39uxlGDY_400x400.jpg)
पुणे । प्रतिनिधी
गणेशोत्सव हा पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मात्र, यावर्षी कोरोना विषाणुच्या संकटामुळे या सोहळ्यात विघ्न आणले आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पुणेकरांना जगाला आदर्श घालून द्यावा, असे आवाहन पुणे पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी केले आहे.
के. व्यंकटेशम म्हणाले की, पुणे शहराने आजपर्यंत गणेशोत्सवाच्या माध्यमातून जगाला संदेश देण्याचे काम केले आहे.
करोना विषाणूंची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आपण या काळात प्रत्येक सण उत्सव साध्या पद्धतीने साजरे केले आहेत. तसाच यंदाचा गणेशोत्सवही साध्या पद्धतीने साजरा करूया.
दरम्यान, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगीतले की, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नियमावली तयार करण्यात आली असून याला सर्वांनीच सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच यंदा गणेशोत्सव साधे पणाने करावा, मिरवणूक करू नहे तसेच आपल्याच गणेश मंडपामध्येच गणेश मूर्तीचं विसर्जन करावे अशा प्रकारचे आवाहन महापौरांनी या वेळी पुण्यातील सर्व गणेश मंडळांना केले आहे.