breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुनाळेकर-भावेंविरोधात सीबीआयने पुरवणी आरोपपत्र दाखल केले

पुणे | महाईन्यूज |

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्याविरोधात सीबीआयने बुधवारी सत्र न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले. भावे येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत तर पुनाळेकर जामिनावर बाहेर आहेत. सीबीआयने आपल्या विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांच्यामार्फत सहाय्यक सत्र न्यायाधीश एस.आर. नवांदर यांच्या न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले.

2013 मध्ये दाभोलकर सकाळी मॉर्निंग वॉकवर गेले असता अज्ञात बंदूकधार्‍यांनी त्यांना गोळ्या घालून ठार केले. या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पुनाळेकर आणि त्यांचे सहाय्यक भावे यांना 25 मे रोजी सीबीआयने अटक केली होती. पुनाळेकर जामिनावर बाहेर आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button