breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#War Against Corona : पुण्यात २७ वर्षीय तरुणासह कोरोनाबाधित ४ रुग्णांचा मृत्यू; प्रशासनाची चिंता वाढली!

पुणे | पुण्यात मंगळवारी २७ वर्षीय तरुणासह ४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे पुण्यातील मृतांची संख्या आता ३८ वर पोहोचली आहे. परिणामी प्रशासन आणि नागरिकांची चिंता वाढली आहे.

भारतात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 10 हजारांपेक्षा जास्त झाली आहे. तर मृत्यू झालेल्यांची संख्या 339 वर गेली आहे. महाराष्ट्रातल्या रुग्णांची संख्या 2334 एवढी झाली आहे. तर 160 लोकांचा मृत्यू झालाय. यात 101 जण हे फक्त मुंबईमधले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. प्रचंड लोकसंख्या, दाटीवाटीतली घरं, झोपडपट्ट्या, अस्वच्छता यामुळे कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. तर सर्व देशात प्रत्येक 5वा रुग्ण हा महाराष्ट्रातला आहे.

हा प्रसार रोखण्यासाठी सरकार युद्धपातळीवर काम करत आहे. सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत ‘मिशन धारावी’ सुरू करण्यात आलं असून तब्बल साडेसात लाख लोकांचं स्क्रिनिंग होत आहेत. त्यामध्ये ज्यांना लक्षणे आढळली त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जात आहे. मुंबईतला कोरोनाचा प्रसार काही थांबता थांबेना. अतिशय झपाट्याने या काही भागात कोरोनाचा प्रसार होतोय. त्याची साळखी तोडण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. मात्र त्यात अजुनतरी यश आलेलं दिसत नाही.

मुंबईतला जी दक्षिण हा वॉर्ड सर्वात जास्त धोकादायक बनला आहे. गेल्या 12 तासांमध्ये तिथे 28 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे या वॉर्डमधल्या रुग्णांची संख्या 308वर गेली आहे. जी दक्षिण या वॉर्डमध्ये वरळी, प्रभादेवी, एलफिन्स्टन हे उच्चभ्रू आणि झोपडपट्टी असलेले विभाग येतात.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button