breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात शनिवारी पाणी पुरवठा बंद राहणार; पाणी जपून वापरा, पालिकेचे आवाहन

पुणे |महाईन्यूज|

पुणे शहराच्या काही भागांतील पाणीपुरवठा शनिवारी (दि. 26) बंद ठेवण्यात येणार आहे. पर्वती, बंडगार्डन व नवीन लष्कर जलकेंद्र अखत्यारीतील पाइपलाइनच्या देखभाल-दुरुस्तीचे काम शनिवारी सकाळी 9 ते रात्री 9 दरम्यान हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारपासून (दि. 27) या सर्व भागातील पाणीपुरवठा पूर्ववत होईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

या भागात बंद राहणार पाणीपुरवठा

कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, केशवनगर, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी, हांडेवाडी रोड, फुरसुंगी, फातिमानगर, एनआयबीएम, घोरपडी, बीटी कवडे रोड, रामटेकडी, मीठानगर, वैदूवाडी, बिबवेवाडी संपूर्ण परिसर, मार्केट यार्ड, डायस प्लॉट, गुलटेकडी, सहकारनगर, भवानी पेठ, गंज पेठ, घोरपडी पेठ, मुकुंदनगर, सॅलिसबरी पार्क, महर्षीनगर, पद्मावती, इंदिरानगर, बालाजीनगर, तळजाई वसाहत, धनकवडी, खराडी, चंदननगर, हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, दत्तनगर, आंबेगाव पठार, कात्रज, कोंढवा बुद्रुक, शिवाजीनगर, कोथरूड, गोखलेनगर, शास्त्रीनगर, घोले रोड, आपटे रोड.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button