breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी, शिवसेनेमुळे राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी

पुणे : राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये पहिल्यांदाच महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) प्रयोग पुणे जिल्ह्यात यशस्वी झाला आहे. महाविकास आघाडीनं भाजपला (BJP) चांगलाच धक्का दिला आहे. हवेली पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या (Shiv Sena) सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) उमेदवारांना पाठिंबा दिला. त्यामुळे हवेली पंचायत समितीच्या उपसभापतीपदी महाविकास आघाडीच्या हेमलता बडेकर (Hemlata Badekar) विजयी ठरल्या आहेत.

हवेली पंचायत समितीच्या महात्मा गांधी हॉलमध्ये झालेल्या उपसभापतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या हेमलता बडेकर यांनी भाजपचे पंचायत समिती सदस्य अनिरुद्द यादव यांचा १६ विरुध्द ३ अशा मोठ्या फरकाने पराभूत केले. हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत, महाविकास आघाडीच्या वतीने हेमलता बडेकर यांनी तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने अनिरुद्द यादव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघारी घेण्याच्या निर्धारीत वेळेत दोघांचे उमेदवारी अर्ज राहिल्यानं मोठी चुरशी निर्माण झाली होती. घेण्यात आलेल्या मतदानात हेमलता बडेकर यांना१६ तर अनिरुध्द यादव यांना केवळ ३ मते मिळाली.

निवडणुक निर्णय अधिकारी सचिन बारवकर यांनी हेमलता बडेकर यांची उपसभापती निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली. या निवडणुकीत शिवसेनेच्या सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार हेमलता बडेकर यांना पाठिंबा दिल्यामुळे भाजपचे स्वप्न भंगले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button