breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात दोन गटात राडा, गाड्यांंची तोडफोड आणि दगडफेक

पुणे |महाईन्यूज|

पुण्यामध्ये धुळवड खेळताना दोन गटांमध्ये राडा झाला आहे. यात मोठ्या प्रमाणात गाड्याचीही तोडफोड करण्यात आली आहे. चतुःशृंगी परिसरातील खैरेवाडी येथे ही घटना घडली. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

पुण्यातील या राडेबाजीचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. यात एकमेकांचा पाठलाग करत दगडफेकही करण्यात आल्याचं दिसत आहे. चतुःशृंगी पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

राडेबाजीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुरुवातील एका गटातील काही तरुणांकडून दगडफेक होते. तसेच आजूबाजूच्या गाड्यांचीही तोडफोड होते. त्यानंतर समोरील गटाचे तरुणही लाठ्याकाठ्या घेऊन येतात. ते आधीच्या गटातील तरुणांचा पाठलाग करतानाही या सीसीटीव्हीत दिसत आहे. या राडेबाजीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलिस याचा तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button