breaking-newsताज्या घडामोडीपुणे
पुण्यात गोल्डमॅनचं निधन…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/moje.jpg)
पुणे | पुण्यातील प्रसिद्ध गोल्डमॅन व उद्योजक सम्राट मोझे यांचे हृद्यविकारकने निधन झालं. पुण्यातल्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान सम्राट मोझे यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या आठवड्यातच त्यांनी आपला 39 वा वाढदिवस साजरा केला.
सम्राट मोझे यांचं बालपण चिंचवड गावात गेलं, त्यांचे प्राथमिक शिक्षण चिंचवडच्या चापेकर शाळेत झाले होते. नंतर ते पुण्यात स्थायिक झाले. वडील रामभाऊ मोझे यांच्या राजकीय कारकीर्तिमुळे त्यांना राजकीय वारसा लाभला.