breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात खासदार सुप्रिया सुळेंची बॅटिंग !

पुणे –  राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हडपसरमध्ये सेल्फ डिफेन्सच्या कार्यक्रमात तलवारबाजी केली होती. त्यांनंतर पुण्यातील आज महिला किक्रेट करंकड स्पर्धेत त्यांनी उद्घाटनानंतर बॅट हातात घेवून फलंदाजीचे काैशल्य दाखविले. त्यामुळे तलवारबाजीनंतर फलंदाजीचे कसबं दाखविल्याने तेथील सर्वच आश्चर्य चकित झाले आहेत.

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात काँग्रेसकडून वीस वर्षाखालील महिला क्रिकेट करंडक स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. या क्रिकेट स्पर्धेच उद्घाटन सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनानंतर बॅट हातात घेत आपल्यातील फलंदाजीचे कौशल्य दाखवले. तसेच त्यांनी गोलंदाजीही केली. सुप्रिया सुळेंना साडीमध्ये फलंदाजी करताना बघून तेथील सर्वच आश्चर्यचकित झाले. यावेळी सुप्रिया सुळेंना माध्यमांनी माधूुरी दीक्षितबाबत प्रश्न विचारले असता, “पुण्यातून कुणीही उभं राहिलं, तरी त्यांना माझ्या शुभेच्छा”, असे उत्तर त्यांनी दिले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button