breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात खासदार गिरीश बापट यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

पुणे महाईन्यूज

पीएमपीएल बस सेवा बंद केल्याने पुणेकरांची गैरसोय होत असून भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले. खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली स्वारगेट पीएमपीएल डेपोसमोर या विरोधात आंदोलन सुरु करण्यात आले होते. यावेळी ”पुण्याच्या रक्तवाहिनीला वेठीस धरु नका” अशा घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांसह बापट यांनी पीएमपीएल बसमध्ये बसून आंदोलन सुरु केले होते. दरम्यान, बापट यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत काल झालेल्या बैठकीनंतर पुणे, पिंपरी, आणि जिल्ह्यात दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदीचे आदेश काढण्यात आले आहेत. दरम्यान, हॉटेल, मॉलसह पुण्यातील सार्वजनिक वाहतूकीचा कणा असलेली पीएमपीएल देखील आजपासून पुढील 7 दिवस बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान या विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेत या निर्णयाला विरोध केला. पुणेकरांची गैरसोय पीएमपीची बससेवा बंद असल्याने भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

”आम्हाला सरकारला सहकार्य करायचे आहे, राजकारण करायचे नाही. चुकीच्या नियोजनाचा किती मोठा फटका बसतो याचा अनुभव घेतला आहे” यावरुन सरकारने शहाणे व्हावे” अशी खोचक प्रतिक्रिया बापट यांनी यावेळी दिली. यावेळी भाजपचे शहरध्यक्ष जगदीश मुळीक येथे उपस्थित होते. दरम्यान स्वारगेट डेपो येथे सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान, पीएमपीएल अधिकारी व पोलिसांनी खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. शहरात जमावबंदी लागू असून आंदोलन संपविण्याची विनंती केली. मात्र, ही विनंती धू़डकावून आंदोलन माघार घेण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी बापट यांच्यासह आक्रमक भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button