breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात कंटेन्मेंट झोनमध्ये स्वॅब कलेक्शन आता बसमधूनही : महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे |महाईन्यूज | प्रतिनिधी

पुण्यात कंटेन्मेंट झोनमध्ये स्वॅब कलेक्शन आता बसमधूनही उपलब्ध होतील, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनीं दिली.

कंटेन्मेंट क्षेत्रातील नागरिकांची जास्तीत जास्त प्रमाणात तपासणी करण्यासाठी, आपल्या महापालिकेने क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटर प्रा.लि. यांच्याकडून सर्व प्रकारच्या सुविधा असलेली वातानुकूलित लॅब बस तयार करून घेतली आहे. या लॅबमध्ये एक्स-रे मशीन, स्वॅब कलेक्शन, पॅथॉलॉजी लॅबची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे लवकरात लवकर रुग्णाचा निदान होण्यास मदत होणार आहे. आज या वातानुकूलित लॅब बसचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले.

या वातानुकूलित लॅब बसद्वारे बाधीत क्षेत्रात सर्व नागरिकांची घरोघरी जाऊन स्क्रिनिंगद्वारे तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अजून एक चांगली अत्याधुनिक पद्धतीची यंत्रणा कोरोना विरुद्धच्या लढ्यात राबविण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button