breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात एअर होस्टेसवर बलात्कार; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे |महाईन्यूज|

पुण्यात २६ वर्षीय तरुणीवर (26 years old Girl rape in Pune) बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बलात्कार झालेली पीडित तरुणी इंडिगो एअर लाईन्समधील एअर होस्टेस (Indigo Air Line Air Hostess) असल्याची माहिती मिळत आहे. वाकड पोलीस ठाण्यात बलात्कार आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळते. तरूणीची आणि आरोपीची सोशल मीडियावर ओळख झाली होती.

अभिजीत सीताराम वाघ असं संशयित आरोपीचे नाव असून पोलीस त्याचा तपास घेत आहेत.

आरोपीची आणि पीडित तरुणीची टिंडर वरून ओळख झाल्याची माहिती समोर आली आहे. टिंडर हे ऑनलाइन डेटिंग ऍप असून तरूणाईत या ऍपला सर्वाधिक पसंती आहे. तरुणीवर अत्याचार करून तिला जबर मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये पीडित तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला ससून रुग्णालयात दाखल केलं आहे. तिच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button