breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात अमेरिकेहून आलेला एक जण पॉझिटिव्ह; राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 12

पुणे |महाईन्यूज|

कोरोना व्हायरसचा धोका वाढला आहे. पुण्यात आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या 9 झाली आहे. महाराष्ट्रात आता कोरोना बाधितांची संख्या 12 झाली आहे. दुबईहून आलेल्या एका दांपत्याला पुण्यात प्रथम कोरोना व्हायरस असल्याचं उघड झालं. त्यांच्या संपर्कात आलेल्या आणखी काही जण कोरोना पॉझिटिव्ह सिद्ध झाले. आज सापडलेला रुग्ण अमेरिकेहून नुकताच पुण्यात आल्याचं उघड झालं आहे.

महाराष्ट्रात पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक म्हणजे एकूण 9 रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. 1 मार्च रोजी पुण्यातील नागरिक अमेरिकेहून परत आला होता. त्याची तपासणी 11  मार्च रोजी करण्यात आली, ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 9 वर गेली आहे.

पुण्याच्या या रुग्णांखेरीज मुंबईत 2 आणि नागपूरमध्ये 1 रुग्ण कोरोनाबाधित आहे. याशिवाय संशयित रुग्णांची संख्या राज्यभरात वाढली आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना संशयित आढळले आहेत. त्यांच्यात लक्षणं दिसल्यामुळे आणि परदेशातला प्रवास लक्षात घेऊन त्यांचं विलगीकरण करण्यात आलं आहे. कोरोनाच्या चाचणीसाठी त्यांचे स्वॅब लॅबमध्ये देण्यात आले आहेत. या सर्व संशयितांचे रिपोर्ट अद्याप प्रतीक्षेत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button