पुण्यातील वेल्हा तालुक्याचे ‘राजगड’ नामकरण करा – सुप्रिया सुळे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/Supriya-Sule.jpg)
पुण्यातील वेल्हा तालुक्याचे राजगड असे नामकरण करा अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांनी ही मागणी केली आहे. वेल्हा तालुक्याचे पुन्हा एकदा राजगड असे नामकरण व्हायला हवे अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली असून लवकरच सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती केली आहे.
सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की, “छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी असा ज्याचा लौकीक आहे तो किल्ले राजगड वेल्हा तालुक्यात आहे. येथूनच शिवरायांनी दोन दशकांहून अधिक काळ कारभार पाहिला. स्वराज्याचे स्वप्न पाहिले,जपले व ते प्रत्यक्षात आणले. मराठी माणसांच्या अस्मितेचे प्रतिक म्हणून राजगड अतिशय महत्त्वपूर्ण आहे. यामुळेच ज्या वेल्हा तालुक्यात हा किल्ला आहे. त्या किल्ल्याचे नाव त्या तालुक्यात देण्यात यावे अशी आमची मागणी आहे”.
छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी असा ज्याचा लौकीक आहे तो किल्ले राजगड वेल्हा तालुक्यात आहे.येथूनच शिवरायांनी दोन दशकांहून अधिक काळ कारभार पाहिला.स्वराज्याचे स्वप्न पाहिले,जपले व ते प्रत्यक्षात आणले. (१/४)