breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यातील ‘मराठा ‘विचारमंथन’ला सातारच्या दोन्ही राजेंची दांडी

पुणे |महाईन्यूज|

मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. सर्वोच्च न्यायालयासह राज्य सरकारवरही टीका झाली होती. त्यामुळे पुढे नेमकी कोणती भूमिका घ्यायची, आंदोलनासंदर्भात कोणता निर्णय घ्यायचा याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. आरक्षण प्रश्नावर समाजात एकवाक्यता येणे आवश्यक होते. त्याच पार्श्वभूमीवर आज (शनिवारी) पुण्यात विचारमंथन बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, पुणे येथे आज झालेल्या मराठा समाजाच्या विचारमंथन बैठकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज, खासदार उदयनराजे भोसले व साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोघांनीही पाठ फिरविली.

या विचारमंथनसाठी २५ सप्टेंबरला आमदार विनायक मेटे यांनी स्वतः साताऱ्यात येऊन दोन्ही राजांची भेट घेऊन बैठकीचे विशेष निमंत्रण दिले होते, तसेच दोघांनाही मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करण्याची विनंती केली होती.

आमदार मेटे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदीर पॅलेज या निवासस्थानी भेट घेऊन निमंत्रण दिले होते. यावेळी दोन्ही राजांनी निमंत्रण स्वीकारून बैठकीस येणार असल्याचे सांगितले होते. पण, दोघांनीही आंदोलनाचे नेतृत्व करण्यास नकार दिला होता. त्यानुसार आज दोन्ही राजे या बैठकीस उपस्थित राहणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात दोन्ही राजे बैठकीस उपस्थित राहिले नाहीत. यासंदर्भात त्यांच्या जवळच्या समर्थकांशी संपर्क साधला असता, खासदार उदयनराजे भोसले हे नाशिकला गेल्याचे सांगण्यात आले. तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे पुण्यातच असल्याचे सांगण्यात आले. साताऱ्याचे दोन्हीही राजे पुण्यातील बैठकीला उपस्थित राहिले नसल्याने त्या मागची कारणे आता मराठा समाजातील कार्यकर्ते शोधू लागली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button