breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यातील कॉलेजला ३० मार्चपर्यंत सुट्टी ‘हा’ व्हायरल मेसेज चुकीचा

पुणे | कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील महाविद्यालयांना २० ते ३० मार्च सुटी देण्यात आल्याचा संदेश सध्या सोशल मीडियावर फिरतो आहे. पण हा संदेश चुकीचा असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्पष्ट केले.

विद्यापीठाकडून अशी कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही. कोणीतरी खोडसाळपणे हा संदेश सोशल मीडियांमध्ये व्हायरल केल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे. कोरोना व्हायरसची लागण झालेले पाच रुग्ण पुण्यामध्ये आढळून आले आहेत. त्यामुळे आता खबरदारीचे उपाय म्हणून काही निर्णय घेण्यात येत आहेत. पुण्याच्या दक्षिण भागातील काही शाळांनी या आठवड्यात सुटी जाहीर केली आहे. तर काही कंपन्यांनीही कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा दिली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना व्हायरसमुळे पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महाविद्यालयाना २० ते ३० मार्च या कालावधीत सुटी देण्यात आल्याचा संदेश सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला होता.

पण हा संदेश चुकीचा असल्याचे विद्यापीठाच्या कुलसचिवांनी बुधवारी सकाळी स्पष्ट केले. चुकीचा संदेश कोणी तयार केले, त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाने दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button