breaking-newsपुणे

पुण्यातील आरटीओ कार्यालय अडीच महिन्यानंतर सुरु

पुणे : पुण्यात लॉकडाऊनमुळे मागील अडीच महिन्यांपासून बंद असलेले प्रादेशिक परिवहन कार्यालयातील नियमित कामकाज आजपासून (19 जून) सुरू होत आहे. पण कार्यालयामध्ये आता प्रत्येक कामासाठी अपॉईमेंट घ्यावी लागणार आहे. कार्यालयातील गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

परिवहन कार्यालयातील परवाना कोटाही जवळपास 80 ते 85 टक्के कमी करण्यात आला आहे. त्यासोबत परिवहन आयुक्त कार्यालयाने राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयातील परवाना, योग्यता प्रमाणपत्र, हस्तांतरण यांसह विविध नियमित कामकाज सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

कोरोना प्रादुभार्वाच्या पार्श्वभुमीवर गर्दी टाळण्यासाठी पुणे कार्यालयाने सर्वच कामांसाठी अपॉइंटमेंट घेणे बंधनकारक ठेवले आहे. अपॉइंटमेंट शिवाय कोणतेही कामं होणार नाहीत. त्यानुसार आयडीटीआर, भोसरी, आळंदी रस्ता, दिवे आणि मुख्य कार्यालयांसाठी स्वतंत्र कोटा निश्चित करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button