breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यातही बांगलादेशी घुसखोर ‘सर्च ऑपरेशन’

पुणे |महाईन्यूज|

बांगलादेशी आणि पाकिस्तानी हटाव या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत मोर्चा काढला होता. या मोर्चानंतर मनसे कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी बांगलादेशी आणि पाकिस्तानी नागरिकांची शोध मोहीम सुरु केली आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यातील धनकवडी परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी ही मोहीम हाती घेतली.

शहरातील धनकवडी भागातील बांगलादेशी लोकांना शोधण्यासाठी मनसे कार्यकर्ते सरसावले, त्यांच्यासह पोलीसही उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी काहींना कागदपत्रांची विचारणा केली त्यातील काही व्यक्तींनी मात्र ते बांगलादेशी नसून बिहारी असल्याचे सांगितले. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण तयार झाल्याचं दिसून आलं.

सातारा रस्त्यावरील धनकवडी भागातील इमारतींमध्ये फिरून घुसखोर बांगलादेशी शोधण्याची मोहीम सुरु होती. त्यावेळी घटनास्थळी सहकारनगर पोलिसही हजर होते. सुमारे 50 मनसे कार्यकर्ते परिसरात फिरून घरांमध्ये कागदपत्रांची मागणी करत होते. जर एखाद्याकडे कागदपत्रे नसतील तर त्यांना त्यांच्या देशात पुन्हा पाठवण्याची मागणी मनसेने केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button