पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/ahilyabai-holkar-mai.jpg)
पुणे – राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध पक्ष, संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने नगरसेवक प्रदिप गायकवाड यांनी सारसबाग येथील आहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
बारा बलुतेदार समाज संघाच्या वतीने संघाचे अध्यक्ष रामदास सुर्यवंशी, दलित महासंघाच्या वतीने आनंद वैराट, दलित पॅंथरचे सुखदेव सोनावने, विलास चौरे समाज प्रतिष्ठानच्या वतीने बाळासाहेब चौर यांनीही सरसबाग येथील आहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करत अभिवाद केले. तर, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने ताडीवाल रोड भागातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. नाना पेठ भाजी मंडई येथे धनगर युवक संघटनेच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला.