पुणे शिक्षक मतदार संघ निवडणूक मतमोजणी : काँग्रेसचे जयंत आसगावकर आघाडीवर !
![Pune Teachers Constituency Election Counting: Congress' Jayant Asgaonkar in the lead!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/काँग्रेसचे-जयंत-आसगावकर-आघाडीवर-.jpg)
पुणे । प्रतिनिधी
राज्यातील विधानपरिषदेच्या 3 पदवीधर, 2 शिक्षक मतदारसंघासाठी आणि एका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी 1 डिसेंबरला मतदान झालं.पुण्यात शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात, पहिल्या पसंतीचे प्राथमिक कल, काँग्रेसचे जयंत आसगावकर आघाडीवर आहेत. तर आसगावकर आणि दत्तात्रय सावंत यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे.
पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतरादरसंघासाठी मतदान झालं आहे. आज या निवडणुकांची मतमोजणी होत असून धुळे नंदुरबारमध्ये भाजपच्या अमरीश पटेलांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
राज्यात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर ही पहिली मोठी निवडणूक असल्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपने ताकद पणाला लावली होती. विधानपरिषदेच्या निकालाचा महाराष्ट्रातील आगामी राजकारणावर परिणाम दिसून येतील.