breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे मेट्रो एप्रिलपासून धावणार; संत तुकारामनगर-फुगेवाडी टप्पा पूर्ण

पुणे |महाईन्यूज|प्रतिनिधी|

पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील संत तुकाराम नगर ते फुगेवाडी या पाच किमीच्या टप्प्याचे काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण करून एप्रिलपासून तो प्रवाशांच्या सेवेत खुला करण्याचे निर्देश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिले.

वनाज-रामवाडी मार्गिकेतील आनंद नगर ते गरवारे हा पाच किमीचा टप्पा देखील जून अखेरपर्यंत पूर्ण करून जुलै महिन्यात प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

राज्याच्या विविध शहरांमध्ये महा मेट्रोच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या मेट्रो प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित, संचालक सुब्रमण्यम रामनाथ, कार्यकारी संचालक एन. एम. सिंग आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुणे मेट्रोचे काम वेळापत्रकानुसार प्रगतीपथावर असून मार्च २०२२ पर्यंत संपूर्ण ३२.५० किमी मार्गावर, दोन्ही मार्गिकांवरील मेट्रो सुरू होईल, असे बैठकीत सांगण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button