Breaking-newsपुणे
पुणे महिला काँग्रेसच्या वतीने गॅस दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/8-6.jpg)
पुणे |महाईन्यूज |प्रतिनिधी|
महिला काँग्रेसच्या वतीने पुण्यात गॅस दरवाढविरोधात झाशीची राणी पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. यावे भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. गॅस दरवाढ करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो, केंद्रातील भाजप सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
या आंदोलनात महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. तसेच गॅस सिलेंडरची प्रेत यात्राही यावेळी काढण्यात आली. महागाईच्या भडक्यात सर्वसामान्य होरपळून निघत असताना त्यात आता गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. एका सिलेंडरमागे सुमारे १४५ रुपये अधिक द्यावे लागणार आहेत. आज राज्यभरात काँग्रेच्या वतीने दरवाढीविरोधात निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात महिलांनी सहभाग नोंदवत मोदी सरकारविरोधात रोष व्यक्त केला.