breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे महापालिकेचा रस्ता हरवला, अधिका-यांना रस्त्यांची अलाईमेंट सापडेना

पुणे |महाईन्यूज|

विमाननगर परिसरात महापालिकेने ५० वर्षांपूर्वी आखलेला एक रस्ताच हरवला असल्याचे समोर आले आहे. हा रस्तारुंदी मोजणीसाठी गेलेल्या महापालिकेच्या अधिकार्‍यांना या रस्त्यांची आखणी (अलाईंमेंट) सापडली नाही, तशी लेखी कबुलीच या अधिकार्‍यांनी दिली आहे. त्यामुळे हा रस्ता नक्की गेला कुठे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

लोहगाव सर्व्हे न. २३० याठिकाणी विमाननगरमधून न्यु एअरपोर्टला जोडणारा रस्ता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २०५ अंतर्गंत १९७० साली आखला होता. महापालिकेने या रस्त्याच्या जागेचा ताबाही २००० मध्ये घेतला होता. मात्र, त्याचा सातबारा करण्याची प्रक्रिया पुढे झाली नाही. जागेवर ५० मीटरचा रस्ताही प्रत्यक्षात अस्तित्वात आहे. आता हा रस्ता ज्या मिळकतीमधून पुढे मुख्य रस्त्याला जोडला जाणार आहे. त्याठिकाणी एका नामंकित शिक्षण संस्थेने बांधकाम सुरू केले आहे. मात्र याच ठिकाणी एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाच्या मालकिची जागा आहे. त्यामुळे याठिकाणी आरक्षित असलेला रस्ता नक्की कोठून जातो यावरुन संस्थाचालक आणि बांधकाम व्यावसायिक यांच्यात सद्या वाद सुरू आहे. त्यामुळे आता हा रस्ता नक्की कुठून आखला आहे, याचा शोध पालिका प्रशासनाकडून सुरू आहे.

त्यासाठी बांधकाम विभागाने या मिळकतीची मोजणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार तातडीची मोजणी ठेवण्यात आली होती. त्यासाठी पालिकेचे आणि नगरभूमापन विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष जागेवर गेले होते. मात्र, मोजणी करण्यासाठी पालिकेच्या भूसंपादन व मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या अधिकार्‍यांना या रस्त्यांची अलाईमेंटच दाखविता आली नाही. तसा लेखी जबाबच या अधिकार्‍यांनी लिहून दिला आहे.

एकीकडे मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या अधिकार्‍यांना रस्त्याची अलाईमेंट सापडत नसतानाच बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी मात्र या रस्त्याचा मोजणी नकाशा आहे. त्यावर चर्तुसिमा दर्शविण्यात हद्दी दर्शविण्यात आल्या आहेत. त्यामुळे रस्ता हरविलेला नाही तर जागेवर आहे असा दावा बांधकाम विभागाने केला आहे.

शासनाने २०१७ च्या मॉडीफिकेशनुसार अस्तित्वातील डीपी रस्ता आणि अधिनियमातील कलम २०५ अंतर्गंतचा रस्ता याची आखणी एकाच पध्दतीने करावी अशा सुचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रशासनाकडून कार्यवाही केली जाईल.

  • राजेंद्र राउत, अधिक्षक अभियंता, बांधकाम विभाग.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button